Pradnya Daya Pawar 
Translator

on Lyrikline: 2 poems translated

from: 德文 to: 马拉地文

Original

Translation

[MOMBASA ISLAND, ZWEITER JULI, MEINE LIEBSTE]

德文 | Thomas Kunst

MOMBASA ISLAND, ZWEITER JULI, MEINE LIEBSTE
Yasmouni, arbeite hier seit gestern als
Entwicklungshelfer, brauche Ablenkung, bevor ich
Endlich wieder was mit einer Frau
Anfange, zuviel Freundschaft zuletzt immer und
Zuwenig Liebe, es ist immer das
Gleiche, bemühe ich mich um
Eine, geht sie am Rand von Sachsen
Schlittschuh laufen, beachte ich sie
Kaum, sind wir ein Paar, ich fahre
Medikamente und Tee nach Tansania und
Ins Landesinnere, da mein Zimmer direkt
Am Tiefseehafen von Kilindini Harbour
Liegt, kann ich keine Nacht schlafen, ständig
Muß ich mit anhören, wie Datteln, Trockenfische
Und Truhen verladen werden, dabei wollte ich
Doch nie nach Afrika, Rimbaud wollte dorthin, ich
Nie, überall Müll und Gemüse, Tücher, Schlangen
Und Ratten, Ratten und Schlangen, die
Garstige Trockenheit an den Wellen der Bleche, die
Barfrau im La Marina kommt aus Trondheim, auch nicht
Gerade um die Ecke, ihre Augen, ihre Haare, ihre
Schultern, theologische Vollkommenheitsbeweise
Zugunsten von Sehnsucht und Toblerone, ihre Art, nie
Mehr Fleisch anzurühren, macht aus mir einen glücklichen
Idioten, ich weiß schon gar nicht mehr, warum ich
Dir das alles schreibe, wenn du keinen Kontakt willst,
Im La Marina, mußt du dich aus allem raushalten und
Stundenlang Erdnüsse kauen, könntest du
Den Ring vom kleinen Finger an der rechten Hand
Bitte einen Finger weiter vorn tragen, davon wird dein
Innenleben heller, deine Seele
Bindungsfähiger, die letzte Nacht habe ich
An einem Container gelehnt, weil ich dachte, er
Macht nicht mehr lange, mit der Stirn und den Händen
An der versprengten Etüde eines Containers,
An den Rippen, an den Klippen eines
Sich nie mehr vom Festland loseisenden
Containers, das ist Afrika, wieviele Haare
Man in den Jahren verliert, erkennt man am
Ehesten nach Umzügen, Garantien der
Ausgekratztheit, die Flusen, die Wüste, der
Staub, dürres, regalloses, inwendiges Gras, mit einem
Hang zu gar keinem Gras, im Herzen des Landes, eine
Frau, die Gott geschickt hat, auf einem Fahrrad mit
Korb, einem Einkaufskorb, einem Einkaufskorb,
Halluzinationen, Erschütterungen, Stotterei, die
Mängel einer vergeblichen Vertrautheit, ihre
Hände nur mit einer Schachtel
Erdbeeren bekleidet, nur ihre Hände, der Rest
Spielt keine Rolle mehr, das ist Afrika, warum ich
Dir das alles schreibe, du bist vielleicht gut, ich brauche
Afrika, bevor ich endlich wieder was mit einer
Frau anfange, einer Frau, die mich selbst
In der Öffentlichkeit monströser Basare und Bibliotheken
In einer schwarzen Badestola in den Wahnsinn
Treibt, und das tust du, du
Glaubst doch wohl nicht wirklich, daß ich
Hierbleibe, nach all den Jahren der Idiotie, der
Leichtsinnigkeit, der Mitschuld und des
Verstandes.

© Thomas Kunst
Audio production: Goethe Institut, 2015

मोंबासा बेट, दोन जुलै, प्रिय यासमोनी

马拉地文

कालपासून मी इथे विकास सहाय्यक म्हणून काम करतोय
मला हवाय थोडासा बदल परत संग करण्यापूर्वी कुणा स्त्रीबरोबर. 
मैत्री मणभर आणि प्रेम कणभर, हाच अनुभव नेहमीचा गाठीला. 
मी प्रयत्न करतो एकीसाठी तर ती झाक्सेनच्या टोकाला स्केटिंग करायला निघून जाते
आणि दुर्लक्ष करायचं ठरवतो तेव्हा प्रेयसीसारखी लाडात येते
 
औषधं आणि चहा घेऊन मी जातो टांझानियाच्या दुर्गम भागात
माझी खोली खोल पाण्यातल्या क्लिनदिनी बंदराच्या अगदी लगत
टक्क जागा मी रात्रभर
ऐकतो आवाज खजूर आणि सुके मासे आणि सन्दुका चढवण्याचे बोटीवर
आफ्रिकेला कधीच जायचं नव्हतं मला, जसं जायचं होतं रिमबोडला
मला नाहीच. 
कचरा आणि भाज्या, कापडं, उंदीर आणि साप, साप आणि उंदीर
गलिच्छ ओंगळपणा पत्र्यावर. 
 
ला मरीना बार
बारगर्ल आहे ट्रेंडहाइमची म्हणजे तीही इथे परदेशी
तिचे डोळे, तिचे केस, तिचे खांदे… 
तिचं गच्च भरलेलं शरीर…. चाळवते ती 
टोब्लेरोनसारखी चळवते. 
तिनं कधी मांसाला स्पर्श केला नाहीय
हे तर मला फारच आवडलंय. 
 
पण मी हे सगळं  तुला का लिहितोय?
मी बजावतोय स्वतःला की जर तुला मरिनामध्ये गुंतणं नकोय 
तर लांब रहा. सगळ्यापासून
तासन तास शेंगदाणे चावत लांब रहा.
यासमौनी,
उजव्या हाताच्या करंगळीतली तुझी अंगठी
तू पुढच्या अनामिकेत सरकवशील?
उजळशील मग तू आतून आणि आत्म्यानं कुणाशीतरी बांधून राहशील. 
 
मी उभा राहिलोय इथे मालवाहू कंटेनरला टेकून
कंटेनर निकामी जमिनीवर नुसता उभा टाकाऊ
माझं डोकं टेकतो मी, हात ठेवतो त्याच्यावर
सामान गोळा केलंय मी माझं अगदी खरवडून,
उरलेत फक्त जमिनीवर पडलेले केस !
डोक्याचे केस किती गेले ते नेमकं कळतं बघ स्थलांतरानंतर
ही आहे आफ्रिका, नद्या, वाळवंट आणि धुळीची
सपाट, पडीक, गवतपण नसलेल्या गवताची
दिसतेय एक स्त्री देशाच्या अगदी अंतर्भागातून आलेली
देवानंच जणू पाठवलेली. 
टोपली असलेल्या सायकलवरची. खरेदीसाठी टोपली.
भास… आभास…निराशा … अडखळणं…अविश्वास
नुसते भास…  
सायकलला लावलेली टोपली स्ट्रॉबेरीनं भरलेली
हात. नुसते हात. स्ट्रॉबेरीनं मढलेले. 
बाकी सगळं नगण्य करत असलेले. 
ही आहे आफ्रिका !

पण कशासाठी तुला हे लिहिण्याचा प्रपंच चाललेला!
बये, हे कळत नाहीये का तुला 
की मला आफ्रिका हवीय ती फक्त कुणातरीबरोबर संग करण्याआधी पुरती.
 
खरंतर मला हवीय एक स्त्री. 
जी मला ओढून नेईल बाजाराच्या गजबजाटात, वाचनालयात
एकाच काळ्या बाथ टॉवेलात, एका काळात
नेईल ओढून ----- आणि तू तेच करतेयस. 
 तुझा असा तर नाही ना विश्वास बसलेला की मी इथेच राहीन म्हणून ?
आपल्या दोघांच्या उथळ वागण्याच्या, निर्बुद्ध चुकांच्या, सगळ्या अपयशांच्या,
भावुकतेच्या आणि समंजसपणाच्या त्या सगळ्या काळानंतरही?

Translation Marathi: Aruna Dhere


- - - alternative translation - - -


मोंबासा बेट, २ जुलै, प्रिय यासमौनी

मोंबासा बेट, २ जुलै, प्रिय यासमौनी 
कालपासून मी इथे विकास सहाय्यक म्हणून काम करतोय 
मला थोडा बदल हवा आहे 
पुन्हा एखाद्या स्त्रीसोबत संबंध जुळावेत म्हणून 
नेहमीचंच आहे हे 
पुष्कळ पुष्कळ मैत्री आणि दुष्कळसं थोडंसं प्रेम 
असंच असतं नेहमी 
कुणा एकीवर मी टाकतो जीव ओवाळून 
आणि ती निघून जाते झाख्सेनच्या टोकाला 
स्केटिंग करण्यासाठी 
मी दुर्लक्ष करतो तिच्याकडे 
मग प्रेमी युगुल होतो आम्ही 
टांझानियाच्या दुर्गम भागात पोहचतो मी प्रवास करून 
औषधं आणि चहा घेऊन 
खोल अथांग पाण्यात क्लिंदिनी बंदरालगत 
आहे माझी खोली 
मी झोपू शकत नाही रात्रभर 
मला सतत ऐकावे लागतात खजुरांनी, सुक्या मासळ्यांनी गच्च भरलेल्या ट्रंकांचे आवाज 
आणि तरीही मला कधीच जायचं नव्हतं आफ्रिकेला 
ते तर रिम्बॉडला जायचं होतं, मला नाही 
सगळीकडे पसरलेला कचरा आणि भाज्या आणि कपडे 
साप आणि उंदीर, उंदीर आणि साप 
गलिच्छ शुष्कपणा पत्र्यांवर 
ला मरिनामधली ती बारगर्ल ट्रोन्डहाईमची आहे 
म्हणजे इथली जवळची नाही 
तिचे डोळे तिचे केस तिचे खांदे 
साक्षात एक परिपूर्ण स्त्रीदेह 
गच्च आसक्ती आणि टोब्लेरॉनसारखं तिचं मधाळ वागणं 
मांसाहाराला कधीही स्पर्श न करण्याची तिची रीत 
मला नादावून सोडते 
पण मी हे सगळं तुला का सांगतोय पत्रातून 
जर एखाद्याला नकोच असेल 
कसलाही संबंध 
तर ला मरिनाला सगळ्यांपासून 
लांबच असायला हवं 
तासन् तास शेंगदाणे चघळत बसावं, झालं... 
एक करशील 
उजव्या हाताच्या शेवटच्या बोटातली अंगठी काढून 
शेजारच्या अनामिकेत सरकवशील? 
अंतर्याम उजळून निघेल तुझं अशानं 
तुझा आत्मा होईल अधिक सक्षम बांधील राहण्यासाठी 
काल रात्री मी मालट्रकला टेकून उभा होतो टाकाऊ झालेल्या 
मी कुठे आहे नेमका 
कपाळ आणि हात टेकून उभा आहे मी 
त्या टाकून देण्याच्या मार्गावर असलेल्या धुडाला 
कधीही जमिनीवरून न हलणाऱ्या त्या ट्रकच्या कडेला 
हे असे आहे आफ्रिका, डोक्यावरचे केस किती विरळ होत गेले 
ते माणसाला स्थलांतरानंतरच कळतं 
धूळ...उखडलं जाण्याची कोरडी भक्क 
ओरखडलं जाण्याची हमी 
नद्या वाळवंट पडिक सपाट जमीन 
आत उगवून येणारं गवत 
जे गवत नसण्याकडे झुकतं 
देशाच्या अगदी आत एक स्त्री 
देवानेच जणू पाठवलंय तिला 
एक बास्केट असलेल्या सायकलीवर 
खरेदीसाठी बास्केट, खरेदीसाठी बास्केट 
भासआभास निराशा तीव्र 
अडखळलेपण 
निष्फळ विश्वासाची हमी 
तिचे हात 
जणू स्ट्रॉबेरीचे हात 
फक्त तिचे हात 
बाकी काहीच नाही महत्वाचं 
हे आफ्रिका आहे, अगं पण मी तुला 
हे सगळं कशासाठी लिहितो आहे पत्रातून? 
तू कदाचित ठीक आहेस 
पण मला मात्र गरज आहे आफ्रिकेची 
अन्य कुठल्याही स्त्रीसोबत 
पुन्हा संबंध जुळण्याआधी 
एक अशी स्त्री 
जी मला ओढून नेईल 
गर्दीने गजबजलेल्या बाजारात, वाचनालयात 
आंघोळीच्या टॉवेलमध्ये काळ्याभोर 
एका वेडामध्ये 
आणि तू नेमकं हेच करते आहेस 
तुझा खरोखर विश्वास बसलाय 
की मी इथेच राहीन? 
एवढा काळ व्यतीत केल्यानंतर 
उनाडपणाचा, अपयशातल्या सहभागाचा 
आणि समजुतीचा 
विवेकाचा 


Translation Marathi: Pradnya Daya Pawar
 

- - - - - 

Translated into Marathi by Aruna Dhere as well as by Pradnya Daya Pawar

A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute in collaboration with Literaturwerkstatt Berlin

[MEINE LIEBSTE GEMAHLIN HOFFENTLICH WIRD ES HEUTE MORGEN]

德文 | Thomas Kunst

MEINE LIEBSTE GEMAHLIN HOFFENTLICH WIRD ES HEUTE MORGEN
Nicht zu hell draußen, denn ich will ohne Anstrengung
An dich denken können, mit welcher Leichtigkeit
Du mir vorgeschlagen hast, allein nach Skudeneshavn
Zu reisen, in die Anstalt der Möwen, Kornfelder
Und Wale, du weißt, daß ich für Sträucher und dicke,
Überschaubare Tiere etwas übrig habe, aber allein
Werde ich diese Dinge nicht so genießen können, wie es
Ihnen zusteht, allein nach Skudeneshavn, du bist
Wahnsinnig, du brauchst viel länger als ich,
Um zu begreifen, daß wir uns lieben, nach all den
Sommerwechseln, unter uns, nach all den Sinfonieresten
Und Kußfetzen, wenigstens in Briefen, meine 
Liebe, weil wir immer viel zu vorsichtig waren, konnten
Wir uns bis zum Ende niemals gegenseitig überraschen,
Unser Anfang war nur ein Spiel, und unser Ende
War die Müdigkeit des Spiels, ich will nachts endlich
Wieder irgendwohin fahren müssen, dahin, wo noch genügend
Aufdringlichkeit auf mich wartet, Aufdringlichkeit
Muß Sehnsucht sein, die sich nicht länger beherrschen
Kann, Skudeneshavn, Skudeneshavn, die Möwen, die
Kornfelder und Wale, du weißt, daß ich dieses Blau
Schon immer geliebt habe, dieses Blau, bei dem
Ich an Krankenhäuser denken muß, an die Flure,
In denen Keime abgetötet werden sollen, dieses Blau, 
Mit seiner Vorliebe für de Verhaltensgestörtheit
Von Violett, du brauchst wirklich viel länger als ich, um
Zu begreifen, daß ich dir, mit meiner einseitigen Liebe, 
Nur einen Gefallen getan habe, mit welcher Leichtigkeit
Ich an dich denken kann, es war doch deine Idee,
Hierher zu fahren, in diese präzisen Horizontanlagen,
Mit ihren treibenden Wetterstämmen, wie überschaubar
Und nachlässig von dir, mich gerade dahin zu schicken,
Wo es mir an nichts fehlen kann, du mußt wirklich
Wahnsinnig sein, mit meiner einseitigen Liebe
Zu dir, du schreibst, du seist dicker geworden, du
Weißt doch, daß ich dieses Blau schon immer geliebt 
Habe, laß die fünf Kilo dort, wo sie sind, denn
Wenn die fehlen, wirst auch du wieder weiter von mir
Entfernt sein, gut, daß ich allein gefahren bin,
Ich denk an dich, aber was
Wäre ich am Fenster ohne Wale.

© Thomas Kunst
Audio production: Goethe Institut, 2015

प्रिय बायको, आशा करूया नसेल आजची सकाळ

马拉地文

प्रिय बायको, आशा करूया 
नसेल आजची सकाळ इतकी लख्ख आज 
कारण फार ताण न घेता 
तुझं स्मरण करायचं आहे मला 
किती सहजगत्या तू मला सल्ला दिलास 
स्कुडेन्सहावेनला एकटंच निघून जाण्याचा 
त्या समुद्रपक्ष्यांच्या, मक्याच्या शेतांच्या, व्हेलमाशांच्या प्रदेशात 
तुला माहीत आहे किती आस्था आहे मला झुडपांबद्दल, 
आणि सहज दिसू शकणाऱ्या महाकाय अजस्त्र प्राण्यांबद्दल 
जसा घ्यायला हवा आस्वाद ह्या सगळ्यांचा 
तसा नाही घेतला तर तू रागवशील... 
तुला जास्त वेळ लागतो जाणून घ्यायला 
की आपलं प्रेम आहे एकमेकांवर अपार 
त्या आपल्या उन्हाळ्यातल्या भेटीनंतर उरलेल्या बंदिशींनंतर 
आणि पुसट अधुऱ्या चुंबनानंतर...निदान पत्रांतल्या 
आपण नेहमीच अतिसावध असतो प्रिये, 
नाही देऊ शकलो आपण एकमेकांना 
कधीच विस्मयाचे न् आश्चर्याचे धक्के 
आपण सुरु केला निव्वळ एक खेळ, 
आणि शेवट झाला त्याचा 
खेळातल्या शेवटाप्रमाणे 
थकून... 
मला रात्री एकदा परत कुठेतरी जायचं आहे 
कुठेतरी जिथे अजूनही ओळखीच्या खुणा 
माझी वाट बघताहेत 
ओळखीच्या खुणा...ओढ...तीव्र ओढाळ 
जास्त वेळ काबूत ठेवता येणार नाही तिला 
स्कुडेन्सहावेन, स्कुडेन्सहावेन...ते समुद्रपक्षी, 
ती मक्याची शेतं : ते व्हेलमासे 
तुला माहितीये ना 
हे निळेपण नेहमीच प्रिय होतं मला 
हे निळेपण मला हॉस्पिटलची आठवण करून देतं 
स्वच्छ पांढऱ्या शुभ्र फरशा जिथं मारले जातात जीवजंतू 
हे निळेपण जे त्रासदायक जांभळ्यात परिवर्तित होतं 
तुला खूप विलंब झाला आहे हे समजून घ्यायला 
की तुझ्यावर एकतर्फी प्रेम करून 
मी उपकारच केलेत तुझ्यावर 
तुझी आठवण सहज येणारी 
तुझीच कल्पना होती इथे येण्याची 
ह्याच क्षितिजाच्या प्रदेशात 
वाहणाऱ्या ऋतूंसमवेत 
तू किती थेट सहजच मला ह्या प्रदेशात पाठवलंस 
जिथं कसलीच उणीव भासणार नाही मला 
तू खरंच वेडी असावीस 
ठार वेडी 
माझ्या तुझ्यावरच्या उत्कट एकतर्फी प्रेमामुळे 
तू लिहितेस 
तू जरा भरली आहेस अंगापिंडाने 
तुला माहीत आहे 
मला नेहमीच मोहवून घेतं हे निळेपण 
ते पाच किलो तिथेच राहू दे 
जिथे आहेत तिथेच... 
कारण 
कारण ते जर नसतील तर 
तू पुन्हा दूर अतिदूरच 
राहशील माझ्यापासून 
हे छानच आहेय 
मी प्रवास करतोय एकटाच 
आठवण काढतोय तुझी 
पण खरंच काय केलं असतं मी 
या खिडकीत व्हेलमासे नसते तर 

Translated into Marathi by Pradnya Daya Pawar

A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute in collaboration with Literaturwerkstatt Berlin