Aruna Dhere 
Translator

on Lyrikline: 5 poems translated

from: 德文 to: 马拉地文

Original

Translation

[MOMBASA ISLAND, ZWEITER JULI, MEINE LIEBSTE]

德文 | Thomas Kunst

MOMBASA ISLAND, ZWEITER JULI, MEINE LIEBSTE
Yasmouni, arbeite hier seit gestern als
Entwicklungshelfer, brauche Ablenkung, bevor ich
Endlich wieder was mit einer Frau
Anfange, zuviel Freundschaft zuletzt immer und
Zuwenig Liebe, es ist immer das
Gleiche, bemühe ich mich um
Eine, geht sie am Rand von Sachsen
Schlittschuh laufen, beachte ich sie
Kaum, sind wir ein Paar, ich fahre
Medikamente und Tee nach Tansania und
Ins Landesinnere, da mein Zimmer direkt
Am Tiefseehafen von Kilindini Harbour
Liegt, kann ich keine Nacht schlafen, ständig
Muß ich mit anhören, wie Datteln, Trockenfische
Und Truhen verladen werden, dabei wollte ich
Doch nie nach Afrika, Rimbaud wollte dorthin, ich
Nie, überall Müll und Gemüse, Tücher, Schlangen
Und Ratten, Ratten und Schlangen, die
Garstige Trockenheit an den Wellen der Bleche, die
Barfrau im La Marina kommt aus Trondheim, auch nicht
Gerade um die Ecke, ihre Augen, ihre Haare, ihre
Schultern, theologische Vollkommenheitsbeweise
Zugunsten von Sehnsucht und Toblerone, ihre Art, nie
Mehr Fleisch anzurühren, macht aus mir einen glücklichen
Idioten, ich weiß schon gar nicht mehr, warum ich
Dir das alles schreibe, wenn du keinen Kontakt willst,
Im La Marina, mußt du dich aus allem raushalten und
Stundenlang Erdnüsse kauen, könntest du
Den Ring vom kleinen Finger an der rechten Hand
Bitte einen Finger weiter vorn tragen, davon wird dein
Innenleben heller, deine Seele
Bindungsfähiger, die letzte Nacht habe ich
An einem Container gelehnt, weil ich dachte, er
Macht nicht mehr lange, mit der Stirn und den Händen
An der versprengten Etüde eines Containers,
An den Rippen, an den Klippen eines
Sich nie mehr vom Festland loseisenden
Containers, das ist Afrika, wieviele Haare
Man in den Jahren verliert, erkennt man am
Ehesten nach Umzügen, Garantien der
Ausgekratztheit, die Flusen, die Wüste, der
Staub, dürres, regalloses, inwendiges Gras, mit einem
Hang zu gar keinem Gras, im Herzen des Landes, eine
Frau, die Gott geschickt hat, auf einem Fahrrad mit
Korb, einem Einkaufskorb, einem Einkaufskorb,
Halluzinationen, Erschütterungen, Stotterei, die
Mängel einer vergeblichen Vertrautheit, ihre
Hände nur mit einer Schachtel
Erdbeeren bekleidet, nur ihre Hände, der Rest
Spielt keine Rolle mehr, das ist Afrika, warum ich
Dir das alles schreibe, du bist vielleicht gut, ich brauche
Afrika, bevor ich endlich wieder was mit einer
Frau anfange, einer Frau, die mich selbst
In der Öffentlichkeit monströser Basare und Bibliotheken
In einer schwarzen Badestola in den Wahnsinn
Treibt, und das tust du, du
Glaubst doch wohl nicht wirklich, daß ich
Hierbleibe, nach all den Jahren der Idiotie, der
Leichtsinnigkeit, der Mitschuld und des
Verstandes.

© Thomas Kunst
Audio production: Goethe Institut, 2015

मोंबासा बेट, दोन जुलै, प्रिय यासमोनी

马拉地文

कालपासून मी इथे विकास सहाय्यक म्हणून काम करतोय
मला हवाय थोडासा बदल परत संग करण्यापूर्वी कुणा स्त्रीबरोबर. 
मैत्री मणभर आणि प्रेम कणभर, हाच अनुभव नेहमीचा गाठीला. 
मी प्रयत्न करतो एकीसाठी तर ती झाक्सेनच्या टोकाला स्केटिंग करायला निघून जाते
आणि दुर्लक्ष करायचं ठरवतो तेव्हा प्रेयसीसारखी लाडात येते
 
औषधं आणि चहा घेऊन मी जातो टांझानियाच्या दुर्गम भागात
माझी खोली खोल पाण्यातल्या क्लिनदिनी बंदराच्या अगदी लगत
टक्क जागा मी रात्रभर
ऐकतो आवाज खजूर आणि सुके मासे आणि सन्दुका चढवण्याचे बोटीवर
आफ्रिकेला कधीच जायचं नव्हतं मला, जसं जायचं होतं रिमबोडला
मला नाहीच. 
कचरा आणि भाज्या, कापडं, उंदीर आणि साप, साप आणि उंदीर
गलिच्छ ओंगळपणा पत्र्यावर. 
 
ला मरीना बार
बारगर्ल आहे ट्रेंडहाइमची म्हणजे तीही इथे परदेशी
तिचे डोळे, तिचे केस, तिचे खांदे… 
तिचं गच्च भरलेलं शरीर…. चाळवते ती 
टोब्लेरोनसारखी चळवते. 
तिनं कधी मांसाला स्पर्श केला नाहीय
हे तर मला फारच आवडलंय. 
 
पण मी हे सगळं  तुला का लिहितोय?
मी बजावतोय स्वतःला की जर तुला मरिनामध्ये गुंतणं नकोय 
तर लांब रहा. सगळ्यापासून
तासन तास शेंगदाणे चावत लांब रहा.
यासमौनी,
उजव्या हाताच्या करंगळीतली तुझी अंगठी
तू पुढच्या अनामिकेत सरकवशील?
उजळशील मग तू आतून आणि आत्म्यानं कुणाशीतरी बांधून राहशील. 
 
मी उभा राहिलोय इथे मालवाहू कंटेनरला टेकून
कंटेनर निकामी जमिनीवर नुसता उभा टाकाऊ
माझं डोकं टेकतो मी, हात ठेवतो त्याच्यावर
सामान गोळा केलंय मी माझं अगदी खरवडून,
उरलेत फक्त जमिनीवर पडलेले केस !
डोक्याचे केस किती गेले ते नेमकं कळतं बघ स्थलांतरानंतर
ही आहे आफ्रिका, नद्या, वाळवंट आणि धुळीची
सपाट, पडीक, गवतपण नसलेल्या गवताची
दिसतेय एक स्त्री देशाच्या अगदी अंतर्भागातून आलेली
देवानंच जणू पाठवलेली. 
टोपली असलेल्या सायकलवरची. खरेदीसाठी टोपली.
भास… आभास…निराशा … अडखळणं…अविश्वास
नुसते भास…  
सायकलला लावलेली टोपली स्ट्रॉबेरीनं भरलेली
हात. नुसते हात. स्ट्रॉबेरीनं मढलेले. 
बाकी सगळं नगण्य करत असलेले. 
ही आहे आफ्रिका !

पण कशासाठी तुला हे लिहिण्याचा प्रपंच चाललेला!
बये, हे कळत नाहीये का तुला 
की मला आफ्रिका हवीय ती फक्त कुणातरीबरोबर संग करण्याआधी पुरती.
 
खरंतर मला हवीय एक स्त्री. 
जी मला ओढून नेईल बाजाराच्या गजबजाटात, वाचनालयात
एकाच काळ्या बाथ टॉवेलात, एका काळात
नेईल ओढून ----- आणि तू तेच करतेयस. 
 तुझा असा तर नाही ना विश्वास बसलेला की मी इथेच राहीन म्हणून ?
आपल्या दोघांच्या उथळ वागण्याच्या, निर्बुद्ध चुकांच्या, सगळ्या अपयशांच्या,
भावुकतेच्या आणि समंजसपणाच्या त्या सगळ्या काळानंतरही?

Translation Marathi: Aruna Dhere


- - - alternative translation - - -


मोंबासा बेट, २ जुलै, प्रिय यासमौनी

मोंबासा बेट, २ जुलै, प्रिय यासमौनी 
कालपासून मी इथे विकास सहाय्यक म्हणून काम करतोय 
मला थोडा बदल हवा आहे 
पुन्हा एखाद्या स्त्रीसोबत संबंध जुळावेत म्हणून 
नेहमीचंच आहे हे 
पुष्कळ पुष्कळ मैत्री आणि दुष्कळसं थोडंसं प्रेम 
असंच असतं नेहमी 
कुणा एकीवर मी टाकतो जीव ओवाळून 
आणि ती निघून जाते झाख्सेनच्या टोकाला 
स्केटिंग करण्यासाठी 
मी दुर्लक्ष करतो तिच्याकडे 
मग प्रेमी युगुल होतो आम्ही 
टांझानियाच्या दुर्गम भागात पोहचतो मी प्रवास करून 
औषधं आणि चहा घेऊन 
खोल अथांग पाण्यात क्लिंदिनी बंदरालगत 
आहे माझी खोली 
मी झोपू शकत नाही रात्रभर 
मला सतत ऐकावे लागतात खजुरांनी, सुक्या मासळ्यांनी गच्च भरलेल्या ट्रंकांचे आवाज 
आणि तरीही मला कधीच जायचं नव्हतं आफ्रिकेला 
ते तर रिम्बॉडला जायचं होतं, मला नाही 
सगळीकडे पसरलेला कचरा आणि भाज्या आणि कपडे 
साप आणि उंदीर, उंदीर आणि साप 
गलिच्छ शुष्कपणा पत्र्यांवर 
ला मरिनामधली ती बारगर्ल ट्रोन्डहाईमची आहे 
म्हणजे इथली जवळची नाही 
तिचे डोळे तिचे केस तिचे खांदे 
साक्षात एक परिपूर्ण स्त्रीदेह 
गच्च आसक्ती आणि टोब्लेरॉनसारखं तिचं मधाळ वागणं 
मांसाहाराला कधीही स्पर्श न करण्याची तिची रीत 
मला नादावून सोडते 
पण मी हे सगळं तुला का सांगतोय पत्रातून 
जर एखाद्याला नकोच असेल 
कसलाही संबंध 
तर ला मरिनाला सगळ्यांपासून 
लांबच असायला हवं 
तासन् तास शेंगदाणे चघळत बसावं, झालं... 
एक करशील 
उजव्या हाताच्या शेवटच्या बोटातली अंगठी काढून 
शेजारच्या अनामिकेत सरकवशील? 
अंतर्याम उजळून निघेल तुझं अशानं 
तुझा आत्मा होईल अधिक सक्षम बांधील राहण्यासाठी 
काल रात्री मी मालट्रकला टेकून उभा होतो टाकाऊ झालेल्या 
मी कुठे आहे नेमका 
कपाळ आणि हात टेकून उभा आहे मी 
त्या टाकून देण्याच्या मार्गावर असलेल्या धुडाला 
कधीही जमिनीवरून न हलणाऱ्या त्या ट्रकच्या कडेला 
हे असे आहे आफ्रिका, डोक्यावरचे केस किती विरळ होत गेले 
ते माणसाला स्थलांतरानंतरच कळतं 
धूळ...उखडलं जाण्याची कोरडी भक्क 
ओरखडलं जाण्याची हमी 
नद्या वाळवंट पडिक सपाट जमीन 
आत उगवून येणारं गवत 
जे गवत नसण्याकडे झुकतं 
देशाच्या अगदी आत एक स्त्री 
देवानेच जणू पाठवलंय तिला 
एक बास्केट असलेल्या सायकलीवर 
खरेदीसाठी बास्केट, खरेदीसाठी बास्केट 
भासआभास निराशा तीव्र 
अडखळलेपण 
निष्फळ विश्वासाची हमी 
तिचे हात 
जणू स्ट्रॉबेरीचे हात 
फक्त तिचे हात 
बाकी काहीच नाही महत्वाचं 
हे आफ्रिका आहे, अगं पण मी तुला 
हे सगळं कशासाठी लिहितो आहे पत्रातून? 
तू कदाचित ठीक आहेस 
पण मला मात्र गरज आहे आफ्रिकेची 
अन्य कुठल्याही स्त्रीसोबत 
पुन्हा संबंध जुळण्याआधी 
एक अशी स्त्री 
जी मला ओढून नेईल 
गर्दीने गजबजलेल्या बाजारात, वाचनालयात 
आंघोळीच्या टॉवेलमध्ये काळ्याभोर 
एका वेडामध्ये 
आणि तू नेमकं हेच करते आहेस 
तुझा खरोखर विश्वास बसलाय 
की मी इथेच राहीन? 
एवढा काळ व्यतीत केल्यानंतर 
उनाडपणाचा, अपयशातल्या सहभागाचा 
आणि समजुतीचा 
विवेकाचा 


Translation Marathi: Pradnya Daya Pawar
 

- - - - - 

Translated into Marathi by Aruna Dhere as well as by Pradnya Daya Pawar

A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute in collaboration with Literaturwerkstatt Berlin

[HILDE IST BESTIMMT GAR NICHT NACH BONN GEFAHREN]

德文 | Thomas Kunst

HILDE IST BESTIMMT GAR NICHT NACH BONN GEFAHREN
Nach Koblenz, Andernach, nach Kiel,
Sie muß hiergeblieben sein, ich spüre mit dem Finger
Ihre Piercingreste in der Luft, wir heirateten zwei
Mal im Schlaf, von allen Seiten, zum Glück
Vergaß sie, ihre Jacke mitzunehmen, ich habe mir
Vorgenommen, kleiner zu werden, mit
Kleineren Kartoffeln, kleinerem Obst, Steakmedaillons und
Winzigen Getränken, ich habe meine Arme
Mit Wäscheleinen enger geschnürt, ich schlafe
Nur noch mit hochgezogenen Knien, ich lese nur
Noch die Buchzeilen genau in der Mitte, ich stelle mich
Tagsüber gekrümmt vor meinen geöffneten Kühlschrank,
Probiere, mit den Händen phasenweise
Drin zu wohnen, lege
Weinverpackungen und Melonentrümmer
Auf die Arme, Arme
Mit nichts dahinter, ich
Hebe ständig Schnecken vom Boden auf, Grashalme,
Filterpapier und die Kinder von Ameisen, ich gehe in
Die Hocke und bleibe so, ich binde mich an einem Baum
Fest und versuche jetzt, von ganz allein zu bluten, ich
Schlenkere mit den Armen, warte auf Wölfe und
Haie, die auch mal für umsonst schwimmen, bin ich
Schon kleiner geworden, Hilde, ich winke ja gar nicht, ich
Warte, ich esse, ich teile mir mit den Wespen
Den kleinsten, jemals von einem Ast gefallenen,
Aufgesprungenen Apfel, ich bin schon
Kleiner geworden, du mußt
Hiergeblieben sein.

© Thomas Kunst
Audio production: Goethe Institut, 2015

हिल्डं गेलेलीच नाही बॉनला, नक्कीच

马拉地文

किंवा कोब्लेन्झला, आंडरनाखला, कीलला
नाही गेलेली. 
ती इथेच राहिली असणार. 
मी स्पर्श करू शकतो वाऱ्यावर तिच्या अवयवांच्या मर्मांना
दोन वेळा झोपेत मीलन झालंय आमचं. संपूर्ण मीलन. 
सुदैवानं ती विसरलीय तिचं जॅकेट न्यायला. 
जॅकेट!
मी ठरवलंय, शिरायचं त्या जॅकेटच्या आत.
लहान व्हायचंय मला. अगदी बारीक. 
मी खातोय छोटे बटाटे, छोटी छोटी फळं,
स्टकेच्या पातळशा लहान चकत्या आणि अगदी घोटभर पेयं. 
मी बांधतोय माझे हात कपडे वाळत घालण्याच्या दोरीनं
गुडघे जवळ घेऊन झोपतोय
वाचतोय ओळी पुस्तकाच्या फक्त मध्यभागीच दिसणाऱ्या
दिवसभर अंग दुमडून फ्रीजमध्ये हात ठेवून प्रयत्न करतोय
ते हळूहळू आक्रसत जावेत असा.
ठेवून वाईनच्या बाटल्यांची आवरणं आणि कलिंगडाच्या खापा
माझ्या अशक्त निर्बल हातांवर
मी बघतोय की मला उचलता येतायत का गोगलगाई
लहान होऊन, जमिनीवरून 
किंवा फिल्टरचे कागद किंवा छोट्याश्या किड्यांची आणखी छोटी पिल्लं.

मी एक मुटकुळं, एका झाडाला बांधून घेतलेलं
हवंय मला रक्तबंबाळ व्हायला. 
म्हणजे येतील कोल्हे, येतील शार्क मला खायला
मी वाट बघतोय त्यांच्या येण्याची आणि ते खरं म्हणजे नुसतेच येऊन जाण्याचीही 
मी खरंच बारीक झालोय का हिल्डं ! झालोय अगदी लहान ?
बघ मी हात सुद्धा हलवत नाहीये अगदी. 
फक्त वाट बघतो हताश आणि खातो, सगळ्यात छोट्या फांदीवरून
तुटून पडलेलं उललेलं बोर 
तेही मी गांधीलमाश्यांबरोबर वाटून घेतो. 
माझी खात्री झालीय बघ की मी अगदी बारीक झालो आहे. 
अगदीच लहान 
आता तू इथे असायला हवं होतं हिल्डं.

Translated into Marathi by Aruna Dhere

A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute in collaboration with Literaturwerkstatt Berlin

rohling

德文 | Ulrike Draesner

in ihn werden sie gegossen
die zukünftigen jahre
ich gebe dir zucker den guten start
als wärst du ein pferd dir die sporen

zu verdienen. so sagt man noch?
genossen die zukunft, stoffbespannt.
wir lassen es, sage ich zu dir: kleben!
wir lassen ein band es umgeben

und nahm als muster den elefanten
das dickhäutige frauengeführte tier
das zu trauern weiß wie es ist an
tagen wie diesem: dass die sonne

scheint das datum stimmt und verrinnt
dass der nächste schritt notwendig
und unwiederbringlich gehst du durchs
schultor mit deinen schuhen größe 30

aus kälbchenhaut. nun wachsen
die weißen großen zähne
dir und ich
             will dich hegen

© 2014 Luchterhand Literaturverlag, München in der Verlagsgruppe Random House GmbH
from: Subsong. Gedichte
München: Luchterhand Literaturverlag, 2014
Audio production: Literaturwerkstatt Berlin, 2014

कोन कार्डबोर्डचा

马拉地文

कार्डबोर्डचा मोठ्ठा रंगीत कोन!
ओतली जातात, भविष्यातली वर्षे त्याच्यात
मी भरवते तुला खाऊचा घास, सुरुवात व्हावी खास, म्हणून -
जणू तू आहेस एक शिंगरू
आणि टाचही मारत जराशी, तुझी यशाकडे घोड्दौड व्हावी सुरू, म्हणून
 
भविष्य हीच तुझी सोबत, जी आहे आत्ता आवरणात
ऐक, मी सांगते तुला, आपण किनई हा कोन चिकटवून बंद करू या
आणि त्याच्या भोवती एक फीत गुंडाळूया
 
फितीवरचं चित्र हत्ती म्हणून निवडलाय मी
समंजस,  सहनशील निबर कातडीचा
आणि हत्तिणीच्या हुकमतीखाली जगणारा प्राणी
पण ज्याला असतं उलटणाऱ्या काळाचं व्याकुळ भानही
 
कसा असतो हा दिवस!
सूर्याचा लख्ख प्रकाश!
वयाशी तारीख जुळते आणि घरंगळूनही जाते.
 
पाऊल उचलून पुढे टाकणं तुझ्यासाठी असतं निर्वाणीचं आवश्यक
अपरिहार्यपणे तू आत शिरतेस शाळेच्या प्रवेशद्वारातून
वासराच्या कातड्याचे चार नंबरचे इटुकले बूट घालून.
 आता तुझे दुधाचे दात पडून
येतील पांढरे शुभ्र शहाणिवेचे दात तुला
आणि आता तुझी निगराणी करायची आहे मला.

Translation into Marathi by Aruna Dhere
A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute

tod einer maus

德文 | Ulrike Draesner

rauheit des halses nur kleines falken &
schlagen sahen ruckenden auges (in
der erinnerung) hielten schon auf
(die hände) eine feldmaus dem räuber
entkommen in ihrem süßen felligen braun
die rührenden bewegungen sahen (maus-ich)
des mäuschens eifrigkeit und hingabe wie
es schutz suchte zuflucht sich drehte tanzte
bis wir tröstend auf es herabblickten über
der kleinen pfütze in die es sich gelegt
abgelegt mit der ergebenshut des sterbenden
tiers sich gebettet. wie konnte es sein dass wir
nichts verstanden weder ihr ende noch uns
in die augen sahen es war der hochzeitstag
den wir nicht feierten vergaßen bereuten
es war endlich und vorbei
so haarig so süß und so starr

© 2014 Luchterhand Literaturverlag, München in der Verlagsgruppe Random House GmbH
from: Subsong. Gedichte
München: Luchterhand Literaturverlag, 2014
Audio production: Literaturwerkstatt Berlin, 2014

एका उंदराचा मृत्यू

马拉地文

घशाला पडलेली कोरड
जणू ससाण्यानंच घातली आहे झडप
पंखाची फडफड, गुदमर, घुसमट
भयचकित विस्फारलेली टकमक नजर
जिवंतपणाच्या आठवणीसाठी
आम्ही ओंजळ पुढे केली 
 
तो एक रान उंदीर होता हल्ल्यातून निसटलेला
त्याच्या गोंडस तपकिरी केसाळ देहाच्या
हालचाली होत्या हेलावून टाकणाऱ्या
चिमुकला उंदीर आणि धडपड त्याची 
परिस्थितीपुढे शरणागत, सुरक्षित आसरा शोधण्याची
 मोठी होतेय ज्योत विझण्यापूर्वीची

तो हलतोय, गोलगोल फिरतोय
जणू नाचतोय
पण आम्ही कळवळून खाली पाहिलं
तर त्या लहानशा थारोळ्यात मरणोन्मुख होऊन त्यानं अंग टाकलेलं
जणू कळलं  होतं त्याला
की मृत्यूच्या सावलीत असणार आहे अंतिम आसरा.
 
असं झालंच कसं, हे आम्हाला कळलंच नाही
त्याचा शेवट आमच्या तर लक्षातही आला नाही
एकमेकांच्या डोळ्यात आम्ही पाहिलंही नाही
लग्नाचा तो असा पहिलाच  वाढदिवस, जो आम्ही साजरा केला नाही
विसरलो, हळहळलो, पश्चात्तापानं उसासलो. 
तो शेवट होता आणि सगळं संपलं होतं 
इतकं दुख:द होतं ते! इतकं सगळं गुंता झालेल!
इतकं गोंडस होतं ! आणि आता इतकं निर्जीव इतकं ताठर झालेलं!

Translation into Marathi by Aruna Dhere
A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute

what is poetry?

德文 | Ulrike Draesner

putzen staubsaugen rotz abwischen geschürftes knie
bauch streicheln zum einschlafen oder wenn er wehtut
ein bettlied singen vorlesen die beine spreizen empfänglich
und tröstlich sein die wäsche in die trommel stopfen
schamhaare aus dem abfluß fischen zum zehnten mal
den klodeckel schließen die gesamten becher der familie
auf der spülmaschine abgestellt in die maschine räumen
fluchen aber unhörbar an die erziehung des mannes
denken jede erziehung aufgeben sich bücken den hund
füttern mensch ärgere dich nicht spielen wie ein trottel
endlich im bad tür von innen abschließen nach einer minute
riesengeschrei: rotz abputzen marmeladenbrot schmieren
marmeladenbrot vom teppich klauben badeanzüge
auswaschen selbst den ganzen tag nicht rausgekommen
hausschlüssel suchen multi-tasking bewundern
und verachten als mutti-tasking verhören toten vogel
vom fensterbrett schippen sich nicht ekeln ihn
in den garten bringen blick auf den sonnensturm
schmetterlinge das ganze zeug am tümpel (muss
auch endlich saubergemacht werden) libellen
für sekunden die spiegelung
sehen: sich selbst
             halbdämmrig, klein
             ein kind das die weißen
             zähne zeigt, deine zähne

es ist dein körper
du weißt kein besseres wort
             für das, was du siehst, lebendig
             und von dir
             unterschieden
weiß es mehr über dich als dir recht
sein kann es sagt: ich liebe
dich tiefer als einen wald

es sagt: dunkel ist das innere des mundes
und alles was denkt

© 2014 Luchterhand Literaturverlag, München in der Verlagsgruppe Random House GmbH
from: Subsong. Gedichte
München: Luchterhand Literaturverlag, 2014
Audio production: Literaturwerkstatt Berlin, 2014

कविता म्हणजे काय ?

马拉地文

साफ सफाई करणे, व्हॅक्युम क्लीनरने केर काढणे, शेंबूड पुसून टाकणे,
खरचटलेला गुडघा आणि पोट कुरवाळणे, झोप लागावी या इच्छेने
किंवा पोटदुखी थांबेल या आशेने एखादी अंगाई म्हणणे, गोष्ट वाचून दाखवणे
पाय फाकवणे प्रतिसादात्मक आणि समजूतदारपणे वागणे
धुण्याचे कपडे यंत्राच्या ढोलात कोंबणे, मोरीच्या जाळीवरची गुंतवळ (बाजूला) गोळा करणे
आणि कमोडचे झाकण दहाव्यांदा बंद करणे
सगळ्या घरादाराने भांडी धुण्याच्या यंत्रावर आणून फेकलेली भांडी यंत्रात धुवायला लावणे
स्वतःशीच तणतणणे, (पण ऐकू न जातील इतपतच), शिव्या घालणे
नवरोबाला काही शिकवण्याचा विचार सोडून देणे, खाली वाकणे
कुत्र्याला खाऊ घालणे, मनातल्या मनात (कुटुंबाला हरू न देण्याचा) सोंगट्याचा पटावरचा खेळ खेळणे
एखाद्या  भ्रमिष्टासारखे कधीतरी शेवटी न्हाणीघरात घुसणे, दार आतून बंद करणे
मिनिट एकच आणि एक खच्चून खच्चून गगनभेदी किंचाळी लगेच!
(पुन्हा) शेंबूड पुसणे, पावाला जॅम चोपडणे, जॅमने माखलेला पाव गालिचावरून उचलणे
पोहणाऱ्यांचे पोषाख धुणे, स्वतःला पूर्ण दिवस बाहेर पडता न येणे
घराची किल्ली शोधून देणे, एकाचवेळी अनेक कामे करण्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल
स्वतःची पाठ थोपटणे आणि त्याचवेळी स्वतःच स्वतःचा तिरस्कार करणे
आईगिरी करते म्हणून दुखणे ऐकणे आणि तिकडे दुर्लक्ष करणे
खिडकीसमोर मरून पडलेला पक्षी केराळयात उचलून घेणे, शिसारीने नाक वाकडे न करणे
केराळे बागेत आणणे
बघणे उन्हाने उजळलेल्या भवतालाकडे, फुलपाखरांकडे
काहीबाही साचून राहिलेल्या तळ्यातल्या पाण्याकडे (एकदा कधीतरी हे स्वच्छ करून घेतलंच पाहिजे)
स्वैर उडणाऱ्या चतुरांकडे
काही क्षण दिसतं प्रतिबिंब स्वतःचं 
जरासं अंधुक लहानसं 
एक मूल दिसतं स्वतःमधलं शुभ्र कोवळ्या दातांचं
 
हे शरीर तुझंच !
तुला ठाऊक नाही अजून समर्पक शब्द याच्यासाठी
आणि तू जे पाहते आहेस त्याच्यासाठी
हे आहे सजीव आणि तुझ्यापेक्षा वेगळं
ज्याला माहित आहे खूप काही, भावविश्व तुझं सगळं !
ते म्हणत, माझं तुझ्यावर प्रेम आहे!
प्रेम एखाद्या रानापेक्षाही खोल आणि दाट
ते म्हणत, एक अंधार आहे बंद ओठांच्या आत
आणि सामावलं आहे विचार करणारं सगळं ज्याच्यात.

Translation into Marathi by Aruna Dhere
A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute