हा आकाराय

हा सन्नाटाय आता सोबत

नि आपण तर काहीच घेतलं नव्हतं

खरं म्हणजे खिसाच नव्हता काही घ्यायला

शिंप्यानं शिवलेला

 

नुस्ताच आकार होता पॅन्टीला खिशाचा

नि खिशाच्या आकारात शिवलेला

एक नोटेचा आकार हुबहू

आपल्या सोबत आलेला

 

जी खर्चली जाणार नव्हती कधीच

अशी शाश्वत नोट होती आपल्याजवळ

खिशाच्या आकारात शिवलेली

खरं म्हणजे नव्हताच खिसा पॅन्टीला

 

नुस्ता आकारंच तर शिवलाय

शिंप्यानं पॅन्टीला आपल्या

नि नुस्त्या आकारात खिशाच्या

एका नोटेचा आकाराय दडलेला

 

नोटेच्या आकारात एक किंमत

न घेता आलेल्या वस्तूंची

नि नुस्ताच एक आकाराय किंमतीचा

नोटेच्या आकारात दडलेला

 

उदाहरणार्थः एक नवी कोरी सायकल

अस्ते नोटेच्या आकारात उभी

जी आपण कधीच घेतलेली नस्ते

नि चालवलेलीही नस्ते कधीच

 

नुस्ताच सायकल चालवल्याचा आकार

थेट दडलेला अस्तो नोटेत

नि त्या आकारात अस्तो उभा मूठभर आनंद

जो नस्तो कधीच मिळवलेला आपण

 

मूठभर आनंदाच्या आकारात

बुडालेली असतात आपली पंचवीसेक वर्षे

जी खरं तर निसटून गेलेली असतात

आपल्या हातून आपल्याही नकळत

 

म्हणजे पंचवीसेक वर्षाचा हा नुस्ता आकाराय

नि आपण थांबलोय अजून तिथेच

वयाच्या थकल्या त्रिज्येवर

जिथे आपण नस्तोच कधी पोहोचलेलो

 

खरं म्हणजे नुस्ताच आकाराय हा आपला

आपल्या समोरून घरंगळत जाणारा

 

 

 

नुस्ता सन्नाटाय सोबत

नि हात आहेत नि पाय सोबत

 

एक जोडी हातांना

एक जोडी पायांनी चालवलं की

गाव ओलांडता येतं माणसाला

 

आपण तर नव्हतंच घेतलं सोबत गाव

नुस्ता आकारच होता गावाचा सोबत

जो टाकला तुडवून पायांनी नकळत

दुसऱ्या गावात येईस्तोवर

 

नि एका गावाने

दुसऱ्या गावाच्या आकाराला भागले

तरी उरतेच कुठे गाव शेवटी?

 

म्हणजे दोन गावं असू शकतात एकाच नावाची

किंवा ती असू शकतात एक दुसऱ्यासारखी तंतोतंत

दोघांची सावलीसुद्धा असू शकते सेम टू सेम

तरीही अस्तंच ना काहीतरी वेगवेगळं दोन गावात नेहमीच

 

म्हणजे या गावचा सदरा

त्या गावाला न्हाई घालता येत कधीच

 

 

 

म्हणजे घर तर

मागेच सोडून आलेलो अस्तो आपण

नि सोबत अस्तो फत्त न संपणारा

शोध एका नव्या घराचा

 

घर लहान अस्तं मोठं अस्तं

छपरांचं पत्रांचं कौलांचं काँव्रीटचं

नि संपला एकदाचा शोध घराचा की

घराचे पाय जन्मताच केले जातात कलम

म्हणून ते राहतं तिथंच थांबलेलं

 

किती घरं भेटली पायांना आजवर

नि पायांना किती किती लागली घरघर

नि दोन्ही हात जोडूनही हरवक्त घराला

कुठे सापडलाय आपल्याला घराचा आकार?

 

घर सोडताना तरी कुठं रडलो म्हणा आपण भरदोर

नि पहिल्या छूट तरी कुठं अडकला होता पाय घरात?

पाय शिर्जोर रेंगाळते अस्तील फार्फार दोनचार साल इथे

तर निघायचीच घाई झालेली हातांना

 

म्हणजे दोन हातांना किंवा दोन पायांना

पाहिजेच अस्तं एक घर खरं तर

जे सुटून जातं बार बार आपल्या हातून

नि येतच नाही आपल्या हाती शेवटलोक

© The Poet
Producción de Audio: Verseville

Only a Shape

This hush is now a companion


and we took absolutely nothing


in fact the tailor hadn’t sewn


a pocket in which to carry things


 


the trousers had only the shape of a pocket


and we carried along


the shape of a banknote


sewn in the shape of a pocket


 


we have an eternal note


sewn in the shape of a pocket


that was never going to be spent


in fact the trousers didn’t have a pocket


 


the tailor has sewn


just a shape to the trousers


and inside that shape


hides the shape of a banknote


 


the shape of the note carries


the price of a thing that couldn’t be bought


just the shape of the price


hides within the shape of the note


 


for instance a brand new bicycle


is parked in the shape of a note


we have never bought the thing


let alone cycled it


 


just the shape of cycling


occupies the note and within that shape


hides a handful of happiness


never obtained


 


in the shape of a handful of happiness


we squandered around twenty-five years


which in fact slipped


from our hands unwittingly


 


the lost time is just a shape


and we are still standing


on the radius of age


where we never reached



in reality this is just our shape


that goes tumbling in front of us


 


 


2


 


Hush alone is the companion


and there are hands and feet


 


if a pair of hands causes


a pair of legs to walk


one can cross a village


 


we didn’t take the village along


we had beside us only the shape of the village


which the feet trod on unknowingly


until the next village arrived


 


If the shape of one village


is divided by another village


does the village remain after all?


 


which means two villages can have the same name


or they can resemble each other to the last grain


even their shadows can be the same


still the two villages always differ in some way


 


which means the shirt of this village


will never fit that village


 

 


3


 


We of course leave


home behind


and for company we have


the search for a new home


 


a house can be large or small


the roof can be thatched


or tiled or of corrugated tin


or beams or concrete


 


the legs of a house


are amputated


right after its birth


that’s why it stays put


 


the feet met so many houses


how footloose the legs were


Even after begging the house


did we ever get the shape of the house?


 


leaving home did we cry and beat our breast?


and did the feet ever get stuck at home in the beginning?


they must have lingered for two or four years at the most


the hands were always in a rush


 


two hands or two feet


really need a home


which slips again and again from our hands


and which we never arrive at till the very end


 


 

Translated from Marathi by Sarabjeet Garcha