rohling

in ihn werden sie gegossen
die zukünftigen jahre
ich gebe dir zucker den guten start
als wärst du ein pferd dir die sporen

zu verdienen. so sagt man noch?
genossen die zukunft, stoffbespannt.
wir lassen es, sage ich zu dir: kleben!
wir lassen ein band es umgeben

und nahm als muster den elefanten
das dickhäutige frauengeführte tier
das zu trauern weiß wie es ist an
tagen wie diesem: dass die sonne

scheint das datum stimmt und verrinnt
dass der nächste schritt notwendig
und unwiederbringlich gehst du durchs
schultor mit deinen schuhen größe 30

aus kälbchenhaut. nun wachsen
die weißen großen zähne
dir und ich
             will dich hegen

© 2014 Luchterhand Literaturverlag, München in der Verlagsgruppe Random House GmbH
Aus: Subsong. Gedichte
München: Luchterhand Literaturverlag, 2014
Audioproduktion: Literaturwerkstatt Berlin, 2014

कोन कार्डबोर्डचा

कार्डबोर्डचा मोठ्ठा रंगीत कोन!
ओतली जातात, भविष्यातली वर्षे त्याच्यात
मी भरवते तुला खाऊचा घास, सुरुवात व्हावी खास, म्हणून -
जणू तू आहेस एक शिंगरू
आणि टाचही मारत जराशी, तुझी यशाकडे घोड्दौड व्हावी सुरू, म्हणून
 
भविष्य हीच तुझी सोबत, जी आहे आत्ता आवरणात
ऐक, मी सांगते तुला, आपण किनई हा कोन चिकटवून बंद करू या
आणि त्याच्या भोवती एक फीत गुंडाळूया
 
फितीवरचं चित्र हत्ती म्हणून निवडलाय मी
समंजस,  सहनशील निबर कातडीचा
आणि हत्तिणीच्या हुकमतीखाली जगणारा प्राणी
पण ज्याला असतं उलटणाऱ्या काळाचं व्याकुळ भानही
 
कसा असतो हा दिवस!
सूर्याचा लख्ख प्रकाश!
वयाशी तारीख जुळते आणि घरंगळूनही जाते.
 
पाऊल उचलून पुढे टाकणं तुझ्यासाठी असतं निर्वाणीचं आवश्यक
अपरिहार्यपणे तू आत शिरतेस शाळेच्या प्रवेशद्वारातून
वासराच्या कातड्याचे चार नंबरचे इटुकले बूट घालून.
 आता तुझे दुधाचे दात पडून
येतील पांढरे शुभ्र शहाणिवेचे दात तुला
आणि आता तुझी निगराणी करायची आहे मला.

Translation into Marathi by Aruna Dhere
A result of the project Poets Translating Poets. Versschmuggel mit Südasien, organised in 2015 by the Goethe Institute